घरदेश-विदेशमुझको याद सताये तेरी...काँग्रेस - जेडीएस आमदारांची शोकांतिका

मुझको याद सताये तेरी…काँग्रेस – जेडीएस आमदारांची शोकांतिका

Subscribe

‘मुझको याद सताये तेरी’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे ती काँग्रेस आणि जेडीएस आमदारांची! कर्नाटकात घोडेबाजार होईल आणि आपले आमदार भाजपच्या गळाला लागतील. या भीतीने काँग्रेस आणि जेडीएस आमदार सध्या बंगळूतल्या हॉटेलमध्ये आहेत. पण त्यांना आता घरची आस लागली असून आमदारांनी ‘घरी जाऊ द्या’ अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केलीय. पण, आमदारांची ही मागणी अमान्य करण्यात आली आहे. जोवर कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बहुमत सिद्ध करत नाहीत तोवर या आमदारांना हॉटेलमध्येच राहावे लागणार आहे.

कुठे आहेत आमदार?

- Advertisement -

कर्नाटकात भाजपने 104 जागी विजय मिळवला. शिवाय सत्ता स्थापनेचा दावा करत बी. एस. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. पण बहुमताचा जादुई आकडा गाठणं भाजपला काही जमले नाही. घोडेबाजार होणार हे लक्षात घेत काँग्रेस आणि जेडीएस यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवलं.काँग्रेसचे आमदार हिल्टॉन हॉटेलमध्ये राहत असून, जेडीएसच्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे 15 मे पासून हे आमदार घरापासून लांब आहेत. त्यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण पक्षाने मात्र आमदारांच्या या मागणीला विरोध केला आहे. ‘जोपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमचे आमदार हॉटेलमध्येच राहणार. सोमवारी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत बैठक घेणार आहे’ अशी माहिती कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वरा यांनी दिली आहे.

सोनिया गांधी, माजी अध्यक्ष काँग्रेस ( फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस )

कुमारस्वामींची शपथविधी सोहळा केव्हा?

- Advertisement -

23 मे अर्थात बुधवारी कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी सोमवारी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. सोनिया गांधी कुमारस्वामींच्या भेटीत सत्ता स्थापनेचे सुत्र ठरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कर्नाटकात 104 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. पण, न्यायालयीन लढाईनंतर भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -