घरदेश-विदेशनिर्दोष आरोपींना न्यायालयाने ठोठावली शिक्षा

निर्दोष आरोपींना न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Subscribe

न्यायालयाने आरोपी भावांना दहा वर्षांची ठोठावली होती शिक्षा.

न्यायालयीन खटल्यात अनेक गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र निदोर्षांना शिक्षा होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. न्यायालयाच्या याच वाक्याला तडा घालणारे एक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने अखेर निर्दोष घोषित केलं आहे. मात्र या निर्णयाला न्यायालयाला तब्बल सात वर्षे लागलीत. दरम्यान, आरोपींना अटक करुन तुरुगात ठेवण्यात आलेले असल्यामुळे न केलेल्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळाली आहे. जय सिंग आणि शाम सिंग असे या दोघांची नावे आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. उशीरा का होई ना मात्र निर्दोष सुटल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण

जय आणि शाम शिंग हे दोन्ही सख्खे भाऊ असून ते फरिदाबाद येथे राहतात. भाचीवर बलात्कार केल्या प्रकरणी या दोघांना शिक्षा झाली. २२ ऑगस्ट २००१ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. फरीदाबाद न्यायालय आणि पंजाब हरियाणा न्यायालयात हा खटला सुरु होता. आपण आरोपी नसल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितले. मात्र कोणतीही सखोल चौकशी न करता यांना बलात्कार प्रकरणी आरोपी ठरवण्यात आले.

- Advertisement -

जून २००३ मध्ये न्यायालयाने त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र जय सिंग याने आपल्या शिक्षेची दहा वर्षे तुरुंगात काढली तर शाम सिंग यांने सात वर्षे तुरुंगात काढली. तुरुंगा बाहेर आल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले. अखेर खटल्यातील सर्व पूरावे खोटे असल्याचे उघडकीस आले आणि न्यायालयाने आपली चुक मानली.

भाचीच्या प्रेमसंबधांना होता विरोध

बलात्काराचा आरोप करणाऱ्या भाचीचे एका तरुणाबरोबर प्रेम प्रकरण होते. याचा विरोध या दोघांनी केला होता. विरोध केल्याने बदला घेण्यासाठी या दोघांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. योग्य तपास न झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -