घरदेश-विदेश'आग्रा'चं नाव देखील बदलणार?

‘आग्रा’चं नाव देखील बदलणार?

Subscribe

आग्रा शहराचं नाव बदलून 'आग्रावन किंवा अग्रवाल करा' अशी मागणी भाजप आमदारानं केली आहे.

उत्तप्रदेश सरकार सध्या शहरांच्या नामांतरावर जोर देताना दिसून येतंय. यापूर्वी उत्तरप्रदेश सरकारनं अलाहाबाद शहराचं नाव प्रयागराज आणि फैजाबाद शहराचं नाव अयोध्या केलं आहे. त्यानंतर आता ‘आग्रा शहराचं नाव बदलून अग्रवाल करा’ अशी मागणी भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी केली आहे. आग्रा शहराचं नाव ‘आग्रावन किंवा अग्रवाल करा’ अशी मागणी आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी केली आहे. आग्रा या नावाला काही अर्थच नाही. त्याचं महत्त्व काहीच नाही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल होतं. इथं अग्रवाल कुटुंब वर्षानुवर्षे राहत होतं. त्यामुळे या शहराचं नाव बदलून आग्रा न ठेवता ते अग्रावन किंवा अग्रवाल असं करा अशी मागणी जगन प्रसाद गर्ग यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. दरम्यान, भाजप आमदार संगीत सोम यांनी देखील मुझफ्फरनगरचे नाव ‘लक्ष्मीनगर करा’ अशी मागणी केली आहे.

नामांतरावर संगीत सोम काय म्हणाले?

केवळ शहरांचं नामांतर करणं हा भाजपचा उद्देश नसून भारताला त्यांची सांस्कृतिक ओळख पुन्हा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुस्लिमांनी हिंदुंचे नियम बदलले. त्यामुळे नामांतर करून भारताची संस्कृती परत मिळवणे आणि संस्कृतीचे जतन करणे हा उद्देश असल्याचे आमदार संगीत सोम यांनी सांगितले. शिवाय, आणखी काही शहरांची नाव देखील बदलण्याची गरज देखील यावेळी सोम यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -

वाचा – फैजाबाद नाही तर अयोध्या!!

भाजपनं सुरू केलेल्या नामांतराला लोकांकडून मात्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यापूर्वी देखील योगी सरकारनं अलाहाबादचं नाव प्रयागराज, फैजाबाद जिल्ह्याचं नाव अयोध्या आणि झकाना स्टेडियमचं नामकरण भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असं केलं आहे. त्यात आता आग्रा शहराचं नाव बदलून ‘आग्रावन किंवा अग्रवाल करा’ अशी मागणी भाजप आमदारानं केली आहे.

वाचा – योगी सरकारनं झकाना स्टेडियमचं नाव बदललं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -