घरदेश-विदेशऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : क्रिश्चियन मिशेलचे दुबईतून प्रत्यार्पण

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : क्रिश्चियन मिशेलचे दुबईतून प्रत्यार्पण

Subscribe

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणातील मध्यस्थ ब्रिटिश नागरिक क्रिश्चियन मिशेलचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा दुबईवरुन त्याला भारतात आणण्यात आले.

UPA-2 च्या काळात ऑगस्टा वेस्टलँड या व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टरच्या खेरदीचा व्यवहार खूपच गाजला. या व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणातील मध्यस्थ ब्रिटिश नागरिक क्रिश्चियन मिशेलचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा दुबईवरुन त्याला भारतात आणण्यात आले.

भारताच्या प्रयत्नांना यश

फेब्रुवारी २०१७ मध्ये ख्रिस्तीयन मिशेलला पोलिसांनी अटक केली होती. युएई सरकारच्या खास विमानानं ख्रिस्तीयन मिशेलला भारताकडे रवाना केले. रात्री ११ च्या दरम्यान ख्रिस्तीयन मिशेलला दिल्ली विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर त्याला दिल्लीतील सीबीआयच्या स्पेशल कोर्टासमोर हजर केले जाईल. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप झाला. या व्यवहारामध्ये क्रिश्चियन मिशेल हा मध्यस्थी होता. जवळपास चार वर्षे केलेल्या भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे.

- Advertisement -

अखेर मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी

३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी भारताच्या तपास यंत्रणांसाठी क्रिश्चियन मिशेलची गरज होती. मागच्या महिन्यात कोर्टाने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. प्रत्यार्पणाची ही प्रक्रिया इंटरपोल आणि सीआयडीच्या समन्वयाने झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमीरातमधील (यूएई) आपले समकक्ष अब्दुल्ला बिन जायद यांच्याशी अबुधाबीमध्ये चर्चा केली होती. सीबीआय आणि ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे भारताने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी औपचारिक स्वरुपात २०१७ मध्ये विनंती केली होती.

हेही वाचा – 

- Advertisement -

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील ‘त्याला’ भारतात आणणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -