घरदेश-विदेशAgusta Westland chopper case : सोनियांविरोधात षडयंत्र - शरद पवार

Agusta Westland chopper case : सोनियांविरोधात षडयंत्र – शरद पवार

Subscribe

ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संपवण्याचा डाव असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकास्त्र सोडलं आहे. ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संपवण्याचा डाव असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक पंतप्रधान पाहिले पण, सत्तेचा वापर करून विरोधकांना संपवणारा पंतप्रधान पाहिला नाही अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे. मंदिर, मस्जिदवर चर्चा करण्यापेक्षा विज्ञान आणि आधुनिकतेवर चर्चा व्हायला हवी. असं देखील पवार यांनी यावेळी म्हटलं.

संरक्षण खात्यातील गैरव्यवहरांबाबत लोकांना आणले जाईल. तशाच प्रकारे मिश्चेलला आणले आहे. त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. त्याच्या आधारे आम्ही विरोधकांना धडा शिकवणार आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. दरम्यान, सध्या साऱ्या गोष्टींचा विचार करता सत्तेचा वापर हा विरोधकांना संपवण्यासाठी होत आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. लोकसभेतील विरोधकांना आणून आम्ही त्याचा निश्चितच विचार करणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देखील पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच केंद्र सरकारकडून स्वायत्त संस्थाकडून हल्ला होत असल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -