घरट्रेंडिंगVideo: ट्रम्प यांनी शेअर केलेल्या बाहुबली व्हिडिओत 'जशोदाबेन'

Video: ट्रम्प यांनी शेअर केलेल्या बाहुबली व्हिडिओत ‘जशोदाबेन’

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात पहिल्यांदाच येणार आहेत. त्यांच्या स्वागतापासून मोदी सरकार जय्यत तयारी करत आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हिडिओ चक्क डोनाल्ड ट्रम्प यांनीच शेअर केला आहे. ट्रम्प यांना बाहुबलीच्या रुपात दाखवलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ट्रम्प यांनी देखील स्वतः हा व्हिडिओ शेअर करत भारतातील माझ्या मित्राने मला पाठवला असल्याचे म्हटले आहे. मात्र या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या शिवगामीच्या रुपात दाखविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच सध्या हा व्हिडिओ ट्विटरवर दिसत नाही आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी भारतात येत असून दोन दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. अमेरिकेचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेतच. मात्र पत्नी मलेनिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि जावई जारेड कुश्नरही सोबत असल्यामुळे भारतीयांना ट्रम्प परिवाराला एकत्र पाहता येणार आहे. त्याआधी आज ट्रम्प यांनी बाहुबलीच्या रुपातील आपलाच व्हिडिओ शेअर केला. मात्र या व्हिडिओ जशोदाबेन या कोण आहेत? हे मात्र ट्रम्प यांना कदाचित माहीत नसावे.

- Advertisement -

ट्विटरवर सोलमिम्स नामक ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. “ट्रम्प यांचा भारत दौरा साजरा करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे. अमेरिका आणि भारत एक राहो..”, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेले आहे.

- Advertisement -

सोलमिम्सने ट्रम्प यांच्यावर दोन व्हिडिओ केले आहेत. यापैकी एक व्हिडिओ खुद्द ट्रम्प यांनी शेअर केला आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत बाहुबली दोनमधील सुरुवातीचा सिन दाखविण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटप्पाच्या भूमिकेत दाखविले आहेत.

एवढेच नाही तर इतरही काही लोकांनी ट्रम्प यांच्यावर मिम्स व्हिडिओ तयार केले आहेत. राजीव यादव या ट्विटर हँडलवरुन ट्रम्प यांना बाजीरावच्या रुपात दाखवण्यात आले आहे. मल्हारी गाण्यावर रणवीर सिंहच्या चेहऱ्यावर ट्रम्प यांचा चेहरा अतिशय चपखलपणे बसविण्यात आला आहे.

मात्र ट्रम्प यांनी शेअर केल्या व्हिडिओवर टीका देखील करण्यात आलेली आहे. भारतातील एका नेटीझन्सने जशोदाबेन यांना पहिल्यांदा मोदींच्या बाजुला पाहण्याचा योग आला असल्याचे सांगितले आहे. तर भारताबाहेरील नेटीझन्सनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -