धक्कादायक! बलात्काराला विरोध केल्याने ७ वर्षांच्या चिमुकलीची काकाने केली हत्या!

Ahmedabad: 7-year-old girl killed by 'uncle' for resisting rape; decomposed body with marks of dog bites found
धक्कादायक! बलात्काराला विरोध केल्याने ७ वर्षांच्या चिमुकलीची काकाने केली हत्या!

बलात्काराला विरोध केल्यामुळे काकाने ७ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीच्या मृतदेहावर कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा आढळल्या आहेत. ही धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी ४६ वर्षीय आरोपी काकाला ताब्यात घेतले आहे. शनिवारी या अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री तिचा मृतदेह कपड्यांशिवाय आणि कुत्र्याने चावा घेतलेला आढळला.

याप्रकरणी अटक केलेला आरोपी भिखा मिस्त्री म्हणून ओळखला जात असून तो मूळचा मेहसानाचा होता. तो अहमदाबाद येथील एका कारखान्यात काम करतो. तो अविवाहित असून पीडित मुलीच्या घराजवळ आपल्या भावासोबत राहतो.

अहमदाबाद डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘१२ सप्टेंबरला ७ वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर मग अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री पीडित मुलीचा मृतदेह आढळला.’

दि इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, डीसीबी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ते म्हणाले की, ‘आमच्या तपासात असे समोर आहे की आरोपी मुलीचा काका समजला जात होता. त्याने मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. १२ सप्टेंबरच्या रात्री ऑटोरिक्षातून त्यांने तिला शेतातील दुर्गम ठिकाणी नेले होते. अटक केलेल्या आरोपीने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.’ त्याने सांगितले की, ‘मुलीला शेतात नेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने तिचा गळा दाबला आणि ती ओरडू लागली. मग त्याने मुलीचे शरीर झुडुपात टाकून तो तिथून पळून गेला.’ आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलामांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – सख्खा भाऊ पक्का वैरी! ‘कोंबडी चोर’ म्हणतं असल्यामुळे केला भावाचा खून