दिल्लीमध्ये एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर ही घटना घडली. बुधवारी रात्री अचानक विमानाला आग लागली. सुदैवाने त्यावेळी विमानात एकही प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
#WATCH Air India Delhi to San Francisco (Boeing 777) flight caught fire in Auxiliary Power Unit (APU) yesterday at Delhi airport. Fire started during AC repair. Air India terms it minor incident, plane was empty at the time of repair work, fire was doused immediately. pic.twitter.com/Og790FVABE
— ANI (@ANI) April 25, 2019
एअर इंडियाच्या विमानाचे दुर्स्तीचे काम सुरु होते. एसी दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. ऑकजिलरी पॉवर युनिटला आग लागली. एअर इंडियाचे बी ७७७-२०० एलआर हे विमान दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्को येथे जाणार होते. त्याआधी विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते तेवढ्यात विमानाला आग लागली. विमानात कोणी नसल्यामुळे कोणतिही अनुच्चित घटना घडली नाही. अग्निशमन दालाच्या जवानांनी ही आग विझवली.