घरदेश-विदेशमालमत्ता विकून एअर इंडिया जमवणार ८०० कोटी

मालमत्ता विकून एअर इंडिया जमवणार ८०० कोटी

Subscribe

तोट्यात सुरु असलेली एअर इंडिया आपल्या मालकीच्या ७० जागा विकून पैसे जमा करणार आहे. या जागांमध्ये निवासी आणि व्यवसायिक जागांचा समावेश आहे.

मागील अनेक वर्षांपासून तोट्यात सुरू असलेली भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने नुकसान भरून काढण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. नुकसान भरपाईसाठी आता इअर इंडिया त्याच्या मालकीच्या जागा विकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या मालकीच्या ७० जागेचा लिलाव करून पैसे  गोळा करणार आहे. या जागाविकून एअर इंडियाला ७०० ते ८०० कोटी मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एअर इंडियाची देशभरात असलेल्या मालमत्तेचा यात समावेश करण्यात येईल. या जागांमध्ये निवासी आणि व्यवसायिक जागांचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून तोट्यात सुरू असल्यामुळे एअरइंडियाचा भार सरकारवर पडत आहे. झालेला तोटा भरून काढण्यासाठी एअर इंडियाला खाजगी कंपन्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तोट्यात असल्याने कोणतीही खाजगी कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी पूढे आली नाही.

म्हणून एअर इंडिया तोट्यात

एअर इंडियाला एप्रिल २०१४ पर्यंत ५ हजार कोटींचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरण्यासाठी २०१३ पासून ५०० कोटी रूपये गोळा करण्याचा प्रयत्न कंपनीद्वारे केला जात होता. भारताच्या एकूण १६ शहरांमध्ये एअर इंडियाची मालमत्ता आहे. ज्यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि अमृतसर या शहरामधील मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांचा लिलाव इलेक्ट्रानिक पद्धतीने केला जाणार आहे. सध्या एअर इंडियावर ५५ हजार कोटींचे कर्ज आहे. कालांतरानुसार कंपनीच्या तोट्यामध्ये वाढ होतांना दिसते. २०१६- १७ मध्ये कंपनीला ४७,१४५.६२ कोटींचे नुकसान झाले होते. एअर इंडियाला चालवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र ज्यादा कर्मचारी आणि कमी प्रवाशी संख्या या कारणामुळे कंपनीचा तोटा अवाक्या बाहेर चालला आहे.

- Advertisement -

“कंपनी मालकीच्या ७० मालमत्ता विकून ७०० ते ८०० कोटी मिळवणे कंपनीचा उद्देश आहे. या जागांमध्ये निवासी आणि व्यवसायिक जागांचा समावेश आहे. यापूर्वीही काही मालमत्ता लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या मालमत्तांना कोणीही विकत घेतले नाही.”- एअर इंडिया अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -