घरट्रेंडिंगAir India विमानाची दुर्घटना टळली; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

Air India विमानाची दुर्घटना टळली; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

त्रिची विमानतळावरुन दुबईकजे जाणारे एअर इंडियाचे विमान संरक्षक भिंतीला धडकले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

तामिळनाडूच्या त्रिची एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं एक विमान दुबईकडे जाण्यासाठी निघालं. मात्र, उड्डाण करतेवेळी हे विमान त्रिची एअरपोर्टच्या संरक्षक भिंतीला धडकलं. त्यामुळे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबई एअरपोर्टवर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एअर इंडियाचं AI ७३७ हे विमान तामिळनाडूहून दुबईला जात असताना हा अपघात घडला. त्यावेळी विमानामध्ये एकूण १३६ प्रवासी होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईमध्ये या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करुन सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला? यामागे काही तांत्रिक कारण होतं की ही पूर्णत: वैमानिकाची चूक होती? याचा तपास सध्या सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे उड्डाण घेतेवेळी विमानाच्या पंख्याला पक्षी आदळल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता विमानतळ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.


खुशखबर: विमान कंपनीचा ‘मेगा सेल’, ९९९ रुपयांत तिकीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -