घरताज्या घडामोडीCorona virus : चीनमधील ३२४ भारतीय दिल्लीत परतले

Corona virus : चीनमधील ३२४ भारतीय दिल्लीत परतले

Subscribe

चीनमधील ३२४ भारतीयांना घेऊन एअर इंड्याचे विशेष विमान चीनमधील वुहान येथून निघाले होते. जे आता दिल्लीत पोहोचले आहे.

सध्या चीनमध्ये एक असा व्हायरस पसरत आहे, ज्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. आतापर्यंत या विषाणूने एकूण २५९ हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर, ४ हजार ५०० हून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे भारताने ही खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरूवात केली आहे. दरम्यान, चीनमधील ३२४ भारतीयांना घेऊन एअर इंड्याचे विशेष विमान चीनमधील वुहान येथून निघाले होते. जे आता दिल्लीत पोहोचले आहे. या गंभीर परिस्थितीतून चीनमधल्या भारतीयांची सुटका करण्यसाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवले होते.

- Advertisement -

एअर इंडियाने पाठवलेल्या विशेष विमानातून ३२४ भारतीय दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असले तरी मात्र, त्यांची तात्काळ सुटका केली जाणार नाही. या सगळ्या रुग्णांसाठी भारतीय लष्कराने हरयाणा येथील मानेसरमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी सर्व भारतीयांची सोय देखील करण्यात आली आहे. विशेषबाब म्हणजे चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सर्व भारतीयाना मानेसर येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.


हेही वाचा – करोना व्हायरसची धास्ती, चीनमध्ये मास्क म्हणून वापरला जातोय ‘ब्रा’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -