Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भारतीय महिला वैमानिक घालणार विश्वविक्रमाला गवसणी

भारतीय महिला वैमानिक घालणार विश्वविक्रमाला गवसणी

जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर करणार उड्डाण

Related Story

- Advertisement -

भारतातील पहिल्या एअर इंडियामधील महिला वैमानिक आज नव्या विक्रमाला गवणसणी घालण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. इतिहासात प्रथमच महिला वैमानिकांची टीम जगातील सर्वाधिक अंतर कापणाऱ्या विमानाचे नेतृत्त्व करणार आहेत. या वैमानिकांची टीमचे विमान सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण करेल आणि  जगातील सर्वात लांब मानल्या जाणाऱ्या उत्तर ध्रुवाच्या वरून झेपावत बंगळुरूत उतरेल, यामध्ये सुमारे १६,००० किमीचे अंतर पार केले जाणार आहे.  कॅप्टन झोया अगरवाल या महिला एअर इंडिया वैमानिकांच्या टीमचे नेतृत्त्व करणार आहेत. झोया अगरवाल यांच्यासोबत कॅप्टन थनमई पापागरी, आकांक्षा सोनावणे आणि शिवानी मन्हास विमानाचं नेतृत्त्व करून नवा विक्रम रचतील. उत्तर ध्रुवावरून आतापर्यंत अनेक विमानांनी उड्डाण केलं आहे. मात्र विमानातील सर्व कॅप्टन्स महिला असलेल्या एकाही टीमनं आतापर्यंत ही कामगिरी केलेली नाही. त्यामुळे अगरवाल यांच्या नेतृत्त्वाखालील टीमच्या कामगिरीची नोंद इतिहासात केली जाणार आहे.

‘कॅप्टन झोया अगरवाल यांनी, जगातील अनेकांना उत्तर ध्रुव पाहता येत नाही. कित्येक जण तर नकाशातदेखील कधी उत्तर ध्रुव पाहत नाहीत. त्या मार्गावरून विमान उड्डाण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाची खूप आभारी आहे,’ अशा भावना व्यक्त केल्या. उत्तर ध्रुवावरून विमान उडवणं अतिशय आव्हानात्मक असल्यानं हवाई वाहतूक कंपन्या या मार्गाची जबाबदारी त्यांच्या सर्वात अनुभवी आणि सर्वोत्तम वैमानिकांकडे देतात, अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. यावेळी एअर इंडियानं ही जबाबदारी महिला कॅप्टनकडे दिली आहे. त्या सॅन फ्रान्सिकोवरून उड्डाण करतील. सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण केलेलं हे विमान उत्तर ध्रुवाच्या वरून झेपावत बंगळुरूत उतरेल, असं देखील या अधिकाऱ्यानं सांगितलं.

- Advertisement -

 


हेही वाचा – रियामुळे आणखी एक सेलिब्रिटी अडचणीत, होतोय ट्रोलर्सचा शिकार


- Advertisement -

 

- Advertisement -