अजय माकन यांच्या राजनाम्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता अजय माकन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याच्या बातमीचे खळबळ माजवून दिली असून ही निव्वळ अफवा असल्याचे आता समोर आले आहे.

Navi Delhi
Delhi president Ajay Maken
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजय माकन (सौजन्य-डीएनए)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याच्या बातमीचे एकच खळबळ उडवून दिली. मात्र ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज, मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर अचानक ही बातमी व्हायरल होऊ लागली. गेल्या अनेक वर्षांपासून अजय माकन दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत आहेत. आपल्या प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा देत असल्याचे कारण समोर येत होते. अजय माकन यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवला असून तो मंजूर झाला नसल्याचे सांगितले जात होते. हीच बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या बातमीला दुजोरा देण्यासाठी किंवा ही फेटाळून लावण्यासाठी एकही काँग्रेसचा नेता समोर आला नाही.


मात्र, व्हायरल होणाऱ्या या बातमीनंतर दिल्ली काँग्रेसचे प्रभारी पी. सी. चाको यांनी वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना ही बातमी फेटाळून लावली आहे. अजय माकन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते उपचारासाठी परदेशात गेले असून लवकरच भारतात परत येतील, असे त्यांनी म्हटले आहे.


कालपासून राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यातच आज त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या राजीनाम्याची अफवा आल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल आहे का, अस प्रश्न उपस्थित झाला आहे. ही बातमी खोटी असली तरी त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.