घरदेश-विदेशएवढं मारेन की कानातून रक्त येईल - ओवेसी

एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी

Subscribe

चहा-चहा ओरडताना लक्षात ठेवा की, मी एवढं मारेन की तुमच्या कानातून रक्त बाहेर येईल', असं वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींना उद्देशून केलं.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमायएमचे अध्यक्ष असवुद्दिन ओवेसी या दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चर्चेचा विषय ठरतो आहे. ‘तेलंगणात सत्ता आली तर ओवेसींना हैदराबादमधून पळवून लावू’, असं वक्तव्य योगींनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यावर पलटवार करत ‘तुमच्या विरोधात बोललो म्हणून आमच्याच प्रांतातून आम्हाला पळवून लावणार का?’ असा सवाल ओवेसे यांनी केला. मात्र, आता या वादात सहभागी होत असवुद्दिन यांचे भाऊ अकबरउद्दीन ओवेसी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. एका सभेमध्ये लोकांना संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतेवेळी अकबरुद्दीन यांची जीभ घसल्याचं पाहायला मिळालं. ‘चहावाल्या आम्हाला उसकवू नकोस. चहा-चहा ओरडताना लक्षात ठेवा की, मी एवढं मारेन की तुमच्या कानातून रक्त बाहेर येईल’, असं वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींना उद्देशून केलं.

 

- Advertisement -


योदी आदित्यनाथांची लायकी आहे का?

योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत अकबरुद्दीन म्हणाले की, ‘आज तेलंगणात आणखी एकजण आला आहे. काय कपडे घालतो तो, एखाद्या तमाशासारखं दिसतो. नशिबाने मुख्यमंत्री झालाय आणि म्हणतो ओवेसीला पळवेन. तुझी लायकी तरी आहे का? आतापर्यंत तुझ्यासारखे ५६ आले आणि गेले. ओवेसीला तर सोडाच पण त्यांच्या पुढच्या १००० जातीदेखील या देशात राहतील आणि तुमच्याविरोधातच लढतील’, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

योगी विरुद्ध ओवेसी

‘हा प्रदेश आमचा देखील आहे. बीजेपी किंवा मोदांच्या विरोधात बोललं, त्यांच्या योजनांमधील फोलपणा दाखवला, आरएसएसवर टीका केली तसंच योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बोललं म्हणून आम्हाला आमच्याच प्रदेशातून बाहेर काढलं जाणार आहे का?’, असा प्रश्न ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -