घरदेश-विदेशअखिलेश - मुलायम पुन्हा जाणार विक्रमादित्य मार्ग परिसरात

अखिलेश – मुलायम पुन्हा जाणार विक्रमादित्य मार्ग परिसरात

Subscribe

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा लखनौ येथील सरकारी बंगल्याचा वाद सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा यादव कुटुंब या परिसरात राहायला जाण्याच्या तयारीत आहेत. मुलायम सिंग आणि अखिलेश यांनी या परिसरात नवीन बांधकाम करण्याचे योजले आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे वडिल समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री मुलायम सिंग यादव पुन्हा एकदा लखनौच्या विक्रमादित्य मार्ग परिसरात राहायला जाणार आहेत. अखिलेश यादव हे त्यांची खासदार पत्नी डिंपल यादव यांच्यासोबत विक्रमादित्य मार्ग परिसरात एक हॉटेल उभारण्याच्या तयारीत आहेत. तर मुलायम सिंग यादव पुस्तकालय तसेच वाचनालय उभारणार आहेत. नुकतेच अखिलेश आणि डिंपल यांनी लखनौच्या विकास प्राधिकरण विभागाकडे जागेचा नकाशा मिळवण्यासाठी मागणी केली आहे. तर मुलायम सिंग यादव हे त्याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी वाचनालय बनवणार असून त्यासाठी त्यांनीही नकाशा मागवला आहे.

हाय सिक्युरिटी झोनमध्ये हा भूखंड

अखिलेश आणि डिंपल यादव यांनी विक्रमादित्य मार्गावरील भूखंड क्रमांक १-ए या जागेवर हिबस्कत हेरिटेज नावाचे हॉटेल बनवण्यासाठीचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडला होता. त्यासंबंधीचे कागदपत्रही बांधकाम विभागाकडे सुपूर्त केले होते. १-ए विक्रमादित्य मार्गावरील हा बंगला अखिलेश यांनी पत्नी डिंपलसोबस २००५ साली विकत घेतला होता. त्यांनी हा बंगला ज्वाला रामनाथ यांची पत्नी कै. कमल रामनाथ यांच्याकडून ३९ लाख रुपयांना विकत घेतला होता. हा भूखंड हाय सिक्युरिटी झोनमध्ये येत असून यामध्ये सात मीटरपर्यंत उंच इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच यासाठीही पोलीस विभागाची नॉन ऑप्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) घेणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे या भूखंडावर केवळ दोनच मजले बांधता येणार आहेत.

- Advertisement -

सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर विक्रमादित्य मार्गावरील सरकारी बंगला अखिलेश आणि मुलायम सिंग यादव यांना बंगला रिकामा करावा लागला होता. मात्र हॉटेल आणि वाचनालय बांधल्यानंतर दोघेही पुन्हा एकदा विक्रमादित्य मार्ग परिसरात राहायला जाणार आहेत. हॉटेल आणि वाचनालयाच्या बांधकामाबाबत कोणताही अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, सर्व नियम आणि प्रक्रीयेनंतरच हॉटेल बांधकामाला परवानगी देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -