काश्मीरवरुन दहशतवाद्यांची भारताला धमकी

अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमान अल जवाहिरीने एका व्हिडिओमार्फत भारत सैन्य आणि भारत सरकारला धमकी दिली आहे.

New Delhi
al qaeda chief ayman al-zawahiri threaten India on Kashmir
काश्मीरवरुन दहशतवाद्यांची भारताला धमकी

काश्मीर मुद्द्यावरून दहशतवाद्यांनी भारताला धमकी दिली आहे. अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमान अल जवाहिरीने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमार्फत त्याने भारतीय सैन्य दल आणि सरकारला धमकी दिली आहे. ‘फाउंडेशन फॉर डिफेंस ऑफ डेमोक्रेसीज लॉन्ग वार जर्नल’ या नियतकालिकेत ही माहिती देण्यात आली आहे. जवाहिरीने अस शबाब या संघटनेद्वारे ‘डोंट फॉरगॉट काश्मीर’ या शिर्षकाखाली पत्र पाठवले आहे.

नेमके काय म्हटले आहे जवाहिरीने?

अलकायदा काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या विरोधात संघटना उभारत आहे. जवाहिरीने म्हटले आहे की, ‘काश्मीरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय सैनिकांवर हल्ला करायला हवा, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. यामुळे भारताच्या मानव संसाधनावर परिणाम होईल आणि भारताला त्याचा मोठा फटका बसेल.’ जवाहिरी जेव्हा व्हिडिओमध्ये बोलत होता त्यावेळी जाकीर मुसाचा फोटो स्क्रिनवर दिसत होता. मात्र तो त्याच्याविषयी काही बोलला नाही. जाकीर मुसाची मे महिन्यात भारतीय सैन्याने हत्या केली होती. तो भारतातील अलकायदाचा प्रमुख होता.


हेही वाचा – दहशतवादी नेपाळमार्गे भारतात करतात घुसखोरी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here