अलर्ट! Whatsapp वर डिलीट होतायत फोटो…

तुम्हालाही व्हॉट्सअॅपटचा अपडेट आला असेल, तर तो डाऊनलोड करण्यापूर्वी एकदा या समस्येविषयी पूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच तुमचं अॅप अपडेट करा.

Mumbai
Alert! WhatsApp deleting photos in chats randomly, here is the reason
प्रातिनिधिक फोटो
तुमच्य मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप चा अपडेट आला आहे का? मग जरा थांबा! व्हॉट्सअॅपचं हे नवीन फिचर तुमच्या App ला फायदेशीर ठरणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते डाऊनलोड करण्यापूर्वी ही माहिती जरुर वाचा. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी फायदेशीर अशा नवनवीन फिचर्सची निर्मिती करत असतं. मात्र, नुकतंच आलेलं Whatsapp चं

जरा सावधान…

या बगमुळे बहुतांशी युजर्सचं स्टेटस ग्रे रंगात बदलत असल्याचंही कळत आहे. तसंच युजर्सच्या फोटोंसह त्यांच्या Whatsapp चॅटमधील फोटोही डिलीट होत आहेत. मात्र, ग्रुप चॅटमधून डिलीट झालेले हे फोटो युजर्सच्या गॅलरीमध्ये सेव्ह होत आहेत. काही युजर्सनी ट्वीटर तसंच अन्य सोशल माध्यमांद्वारे या मुद्द्याविषयी माहिती दिली असून, ते दुसऱ्यांना हा अपडेट डाऊनलोड न करण्याचा सल्लादेखील देत आहेत. त्यामुळे तुम्हालाही व्हॉट्सअॅपटचा अपडेट आला असेल, तर तो डाऊनलोड करण्यापूर्वी एकदा या समस्येविषयी पूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच तुमचं अॅप अपडेट करा.

व्हॉट्सअॅपने अलीकडेच आक्षेपार्ह भाषा आणि धमकीवजा मसेजेससंबंधी एक निर्देश प्रसिद्ध केला होता. यामध्ये जर कुणाला असे मेसेज येत असतील तर त्यांनी [email protected] वर यासंबंधी तक्रार नोदवल्यास लगेच योग्त ती कारवाई केली जाईल, असं नमूद करण्यात आल होतं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here