Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश चीनचे अब्जाधीश जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता

चीनचे अब्जाधीश जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता

कोरोनाच्या काळात जॅक मा हे विविध देशांना मदत करत होते. ते अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Related Story

- Advertisement -

चीनचे अब्जाधीश आणि अलीबाबा समुहाचे संस्थापक जॅक मा हे गेली दोन महिने कोणालाही दिसले नाहीत. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जाता आहे. काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टिका केली होती. मात्र त्यानंतर ते कोणालाही दिसले नाहीत. कोरोनाच्या काळात जॅक मा हे विविध देशांना मदत करत होते. ते अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जॅक मा यांनी ऑक्टोबरमध्ये चीनची बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकेसंदर्भात शांघाईत इथे भाषण केले होते. या भाषणात जॅक मा यांनी सरकारला आव्हान दिले होते. चीनमधील बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड टिका केली होती. त्यांच्या या भाषणानंतर कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.

- Advertisement -

जॅक मा यांनी भाषणात केलेल्या टिकांनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून निशाणा साधण्यात आला. जॅक ना यांच्या अलिबाबा समुहावरही कारवाई करण्याता आली होती. वॉल स्ट्रिट जनरलच्या रिपोर्टनुसार, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावतीने जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्यात आले. त्याचबरोबर ख्रिसमसच्या आदल्या दिवशी देशाबाहेर जाण्यासही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. अलिबाबा समुहावर जोवर कारवाई सुरू आहे तोवर तुम्ही देशाबाहेर जाऊ शकत नाही, असे जॅक मा यांना सांगण्यात आले होते.

जॅक मा हे अफ्रिका बिजनेस हीरोज या शोमध्ये काम करत होते. त्यातही गेल्या काही दिवसांपासून ते दिसले नाहीत. शोमधून त्यांचा फोटोही काढून टाकण्यात आलाय. या शोच्या फायनल्स आधी जॅक मा यांनी १० ऑक्टोबर रोजी शेवटेचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले होते की, ते सगळ्या स्पर्धकांच्या भेटीची वाट पाहू शकत नाहीत. त्यानंतर मात्र त्यांच्या ट्विटर एकही ट्विट करण्यात आलेले नाही.


- Advertisement -

हेही वाचा – देशातील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावं – पंतप्रधान

- Advertisement -