केजरीवालांना मोठा झटका; अल्का लांबा सोडू शकतात पक्ष

अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसू शकतो. कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अल्का लांबा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

New Delhi
alka lamba
केजरीवालांना मोठा झटका; अल्का लांबा सोडू शकतात पक्ष

दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघाच्या आमदार अल्का लांबा यांनी आम आदमी पक्ष सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला (आप) मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्का आणि आपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद सुरु आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये अल्का यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी करावी असे आपकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी तसं न करण्याचं ठरवलं तर आपकडून राजीनामा मागण्यात आला होता, असंही त्यांनी सांगितलं होतं. आपमध्ये आपल्याला दुय्यम वागणूक मिळते, असे बऱ्याचदा अल्का यांनी सांगितलं आहे.

‘काँग्रेसकडून प्रस्ताव आला तर काँग्रेसमध्ये जाईल’

माध्यमांशी बोलताना अल्का लांबा म्हणाल्या की, ‘मला काँग्रेस पक्षाकडून सामील होण्याचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. जर काँग्रेसकडून सन्माने सामील करण्याचा प्रस्ताव आला तर मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करेल. मी २० वर्षे काँग्रेसला दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसने या गोष्टीची दखल घ्यायला हवी. विना निमंत्रण पोहोचलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला जात नाही. त्यामुळे मी निमंत्रणाशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही.’

अल्का यांना येऊ शकतो काँग्रेसचा प्रस्ताव

अल्का लांबा २० वर्षे काँग्रेसमध्ये होत्या. २००३ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटवर पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी मोती नगर या विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते मदन लाल खुराना यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून त्यांनी कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून पुन्हा पक्षात सामील करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here