घरदेश-विदेशझाली! गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका झाली!!

झाली! गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका झाली!!

Subscribe

3 दिवसांच्या रेस्कु ऑपरेशननंतर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या १२ मुलांची त्यांच्या प्रशिक्षकासह सुखरूप सुटका करण्यात आली आहे. २३ जूनपासून ही मुले गुहेत अडकून पडली होती.

थायलंडच्या ‘लुआँ नांग नोन’ या गुहेमध्ये अडकलेल्या १२ मुलांची त्यांच्या प्रशिक्षकासह सुखरूप सुटका करण्यात आली आहे. २३ जूनपासून ही मुले थायलंडच्या गुहेत अडकली होती. अखेर ३ दिवसांच्या रेस्कु ऑपरेशननंतर सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. गुहेत अडकलेली सर्व मुले ११ ते १६ वयोगटातील होती. आपल्या फुटबॉलप्रशिक्षकासह २३ जून रोजी ही मुले गुहेत अडकली होती. गुहेच्या तोंडावर असलेल्या सायकली पाहिल्यानंतर मुले गुहेत अडकल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. जगभरातून मुलांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. अखेर रेस्कु ऑपरेशन राबवत या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

थायलंडच्या ‘लुआँ नांग नोन’ या गुहेमध्ये फुटबॉल कोच एकापोल चॉंटावोंग आपल्या १२ विद्यार्थ्यांसह एका प्रॅक्टिस मॅचनंतर कुतुहलापोटी गेले होते. मात्र मुसळधार पावसाने गुहेतील पाण्याचा स्तर वाढला आणि सगळे जण गुहेतच अडकले. अखेर थायलंडच्या नौदल पथकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर १३ जणांचा शोध लागला. त्यांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी रविवारपासून बचाव मोहीम राबवण्यात आली होती. अनेक दिवसांपासून मुलं गुहेत राहिल्यामुळे त्यांची आता वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांना एखाद्या रोगाची लागण झाली असल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरता त्यांना आई वडिलांपासून दूर ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -