करोनामुळे जागतिक मंदी; व्यवहार ठप्प!

जागतिक पातळीवर करोना संसर्ग फैलावल्यामुळे बहुतेक देशांनी शट डाऊन जाहीर केले असल्याने व्यवहार देखील ठप्प झाले आहेत.

Canada
All airlines closed in the country due to Coronavirus
विमानसेवा

जागतिक पातळीवर करोना संसर्ग फैलावल्यामुळे बहुतेक देशांनी शट डाऊन जाहीर केले आहे. त्याचा थेट परिणाम आता जागतिक अर्थकारणावर होऊ लागला आहे. विमान वाहतूक, औद्योगिक, खाद्यान्न यासह सेवा क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे, त्यामुळे जागतिक आर्थिक मंदी करोना संसर्गमुळे अधिक गडद बनली आहे.

पाच हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले

एअर कॅनडा या कॅनडातील सर्वात मोठ्या विमानसेवा कंपनीने पाच हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. करोना संसर्गमुळे देशातील सर्व विमानसेवा बंद झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे एअर कॅनडा कंपनीतील कामगार नेते वेस्ली लॅसोली यांनी सांगितले. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन एअर कॅनडा कंपनीने दिले आहे.

दुबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन आठवड्यापासून पूर्णतः बंद करण्यात आले आहे. येथून युरोपियन, आशियायी आणि ऑस्ट्रेलिया असे जगभरात विमान उड्डाणे होत असतात. त्यामुळे येथील विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची स्थिती वाईट झाली आहे. स्वस्त दरात विमानसेवा देणारी एस्तार जेट हे दक्षिण कोरियातील पहिली विमानसेवा कंपनी आहे. ज्यांनी जागतिक पातळीवर विमानसेवा क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे कंपनीलाच टाळे ठोकले आहे. याशिवाय एअर सॉउल, एअर बुसान, टी वे या विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. रॉयल डच शेल कंपनीनेही पुढील वर्षभरासाठी ३ ते ४ मिलियन डॉलर कॉस्ट कटिंग करणार आहे.
करोना संसर्गमुळे फ्रान्स देशाने शट डाऊन केल्यामुळे येथील सर्व कार्यालये बंद आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट देखील बंद आहेत, त्यामुळे खाद्यन्न व्यवसायात प्रचंड घसरण झाली आहे.

अमेरिकेत शेअर बाजार गडगडला

युरोप, आशियायी देशांमध्ये करोना संसर्गामुळे बहुतांश देशांच्या शट डाऊन केल्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. पॅरिस, फ्रँकफ्रुट, लंडन मधील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. जपानमधील येऊ घातलेल्या टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची मागणी होत असल्याने जपानचा शेअर बाजारही घसरला आहे.


हेही वाचा – CoronaVirus : पुण्या-मुंबईतून येणाऱ्यांकडे संशयानं पाहू नका – राजेश टोपे


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here