Coronavirus: अनुसूचित जाती व जमाती रेल्वे कर्मचारी संघटना मदत म्हणून देणार ७० करोड

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपला एक दिवसाचा पगार सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे.

New Delhi
All India Scheduled Caste and Scheduled Tribes Railway Employees Association
अनुसूचित जाती व जमाती रेल्वे कर्मचारी संघटना मदत म्हणून देणार ७० करोड

जगभर करोनाने पाय पसरल्यानंतर भारतात देखील करोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडऊन घोषित करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच नागरिकांना बाहेर येण्यास मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, करोनाला रोखण्यसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली आहे. आता अखिल भारतीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेने देखील आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

अखिल भारतीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेने करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपला एक दिवसाचा पगार सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण देणगी तब्बल ७० करोड रुपये देणार आहेत. यामुळे सरकारला करोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक हातभार लागणार आहे.


हेही वाचा – Coronavirus: इटलीत करोनाचं थैमान; दिवसरात्र येतोय केवळ अँबुलन्सचा आवाज


देशात सध्या करोनाचे ६७८ रुग्ण आढळले. यापैकी ४३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक १२४ रुग्ण आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here