India-China Tension : आज ५ वाजता सर्वपक्षीय बैठक; LAC च्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक

pm modi

पूर्व लडाख सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्वपक्षिय बैठक बोलावली आहे. बैठक बुधवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आगामी आगामी आराखड्यावर चर्चा केली जाणार आहे.

याबैठकीत सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सातत्याने मोदी सरकरवर सीमेवरील तणावावरून टीका करत आहेत. विरोधकांकडून प्रश्नांची झडीमार होत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ही बैठक बोलावली आहे.