घरदेश-विदेशविक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार - इस्रो

विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार – इस्रो

Subscribe

विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू

भारताच्या चांद्रयान २ ला चंद्रावर उतरवण्यात अपयश आले. यामुळे शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या महत्त्वकांक्षी मोहिमेला धक्का बसला. मात्र, चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोकडून नवीन माहिती प्राप्त झाली आहे. विक्रम लँडरची जागा ऑर्बिटरद्वारे शोधण्यात आली आहे. लँडरसोबत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोची टीम सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे, असे इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


हेही वाचा- हार्ड लॅण्डिंग होऊनही विक्रम सुस्थितीत

विक्रम लँडरची जागा लक्षात आली असली तरीही कोणत्याही प्रकारचा संपर्क अजून झाला नसल्याचे इस्रोने सांगितले आहे. विक्रम लँडरचा अवघा काही अंतरावर संपर्क तुटल्याने चांद्रयान-२ यशस्वी होऊ शकले नाही.

- Advertisement -

चंद्राच्या पृष्ठभूमीवर आडव्या स्थितीत विक्रम लँडर पडल्याची माहिती सोमवारी इस्त्रोकडे आली, असे असले तरी ऑर्बिटरने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये विक्रम लँडर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे इस्रोने स्पष्ट केले होते. विक्रम लँडरचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे समजले असून शास्त्रज्ञांनी विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -