‘चांद्रयान-२’ अवकाशात जाण्यासाठी सज्ज

भारताचा महत्त्वकांशी प्रकल्प 'चांद्रयान २'चे आज मध्यरात्री २ वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी झाल्याचे इस्त्रोने सांगितले आहे.

New Delhi
All preparatory work for #Chandrayaan-2 launch completed says k sivan
'चांद्रयान-२'

‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणासाठी सर्व तयारी झाली असून उद्या अवकाशात हे यान झेप घेण्यासाठी सज्ज झाले असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले आहे. आज संध्याकाळपासून प्रक्षेपणासाठी काऊनडाऊन सुरु होईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तांत्रिक कारणांमुळे ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मात्र, यातील सर्व तांत्रिक अडचणी दुरुस्त केली असून उद्या प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष सिवन यांनी दिली आहे. उद्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान २’ अवकाशात झेप घेणार आहे.


हेही वाचा – ठरलं! ‘चांद्रयान २’ घेणार २२ जुलैला अवकाशात झेप