पहूल खान हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची सुटका

पेहूल खान हत्या प्रकरणाचा निकाल हा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीस सरीत स्वामी यांनी दिला.

Rajasthan
all six accused acquitted in pehlu khan lynching case
पहूल खान हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची सुटका

बुधवारी देशभरात राजस्थानमधील गाजलेला पेहलू खान मृत्यू प्रकरणाचा स्थानिक न्यायालयाने सर्वच्या सर्व सहा आरोपींची सुटका केली आहे. या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्याक आली होती. पण त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन होते. पेहूल खान हत्या प्रकरणाचा निकाल हा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीस सरीत स्वामी यांनी दिला. १ एप्रिल २०१७ रोजी पहूल खान आणि त्याची दोन मुलं ही गायांची वाहतूक करत असताना गोतस्करीच्या संशयावरून जमावाने बेदम मारहाण केली होती. ही मारहाण झाल्यानंतर दोन दिवसांनी पेहलू खान याचा मृत्यू झाला.

हे प्रकरण १ एप्रिल २०१७ रोजी घडलं. या प्रकरणाचा तपास हा ३० डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण झाला. पण याचे आरोपपत्र हे २४ मे २०१९ रोजी दखल करण्यात आलं. या खटल्याची सुनावणी ७ ऑगस्टपासून सुरू झाली. यादरम्यान ४७ साक्षीदारांना तपासण्यात आले. या प्रकरणात पहूल खानच्या दोन मुलांचे ही साक्ष घेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आला. पण हा व्हिडिओ पुरेसा पुरावा नसल्याचे न्यायालयाने नमूद करत आरोपींची सुटका केली.

नक्की काय घडलं?

पहूल खान आणि त्याची दोन मुलं ही गायची वाहतूक करत होते. पहूल खानचे गाव हरयाणातील नुह जिल्ह्यात आहे. जयपूरहून त्याच्या गावी गायी पाठवल्या जात होत्या. या दरम्यानच बेहरोर येथील जमावाने गोतस्करीच्या संशयावरून पहूल खानचे वाहन राखले. जमावाने पहूलसह सर्वांना काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पहूल गंभीर जखमी झाला. पण त्याच्या या घडनेनंतर दोन दिवसांनी मृत्यू झाला.