‘फेसअॅप’वर आहात? तुमचा डेटा गेलाच समजा!

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 'फेसअॅपची' क्रेझ वाढली आहे. मात्र, या फेसअॅपद्वारे डेटा चोरीला जाण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai
All your friends are posting aging selfies with FaceApp – a Russian app that's raising privacy concerns
'फेसअॅप'वर आहात

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून फेसबुक हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जात आहे. फेसबुकवरील टिंडर, क्वॅक क्वॅक नंतर आता फेसअॅपने फेसबुक युजर्सला भुरळ घालण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील अनेकांना सध्या फेसअॅपचे वेड लावले आहे. मात्र, या अॅपमुळे त्या युजर्सची माहिती चोरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने या फेसअॅपची जगभरात धास्ती व्यक्त केली जात आहे. याविषयी अक्षरश: अमेरिकेच्या खासदारांनीही याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे या अॅपचा तपास केला जावा, अशी मागणी अमेरिकेच्या एका वरिष्ठ खासदराने सिनेटमध्ये केली आहे. फेसअ‍ॅप प्रकरणाचा तपास एफबीआयने करावा, या मागणीसाठी संबंधित खासदाराने संस्थेच्या प्रमुखांना पत्रदेखील लिहिले आहे. तसेच फेसअ‍ॅपच्या माध्यमातून रशिया माहिती गोळा करत असल्याचा संशय खासदाराने व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

फेसअॅपबद्दल व्यक्त केली चिंता

अमेरिकेन सिनेटचे सदस् असलेल्या चक श्युमर यांनी एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी फेसअॅप विषयीची चिंता व्यक्त केली आहे. या फेसअॅपच्या माध्यमातून वापरकर्त्याची माहिती चोरली जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. फेसअॅपचे मुख्यालय सेंट पीटर्सबर्गमध्ये असल्याचे त्यांनी एफबीआयच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि कोट्यवधी अमेरिकन नागरिकांची माहिती धोक्यात असल्याचे श्युमर यांनी पत्रात नमूद केले आहे.

फेसअॅप डिलीट करा

डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीचे प्रमुख बॉब लॉर्ड यांनी देखील फेसअॅप डिलीट करण्याचे बुधवारी आवाहन केले होते. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीला रशियन हॅकर्सचा फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी हे अॅप डिलीट करण्याची मागणी केली आहे.

फेसअॅपद्वारे फोटो व्हायरल

सध्या या फेसअॅपद्वारे मोठ्या प्रमाणात फोटो तयार केले जात असून ते अधिक प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच चित्रपट कलाकारांनी, खेळाडूंनी या अॅपच्या माध्यमातून फोटो एडिट केलेले फोटो शेअर केले आहेत.

फेसअॅप म्हणजे काय?

फेसअॅपची निर्मिती २०१७ मध्ये रशियन कंपनी वायरलेस लॅबने केली होती. फेसअॅप हे आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर काम करते. एआयच्या मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितले जाते. तसेच यामध्ये ओल्ड फेस फिल्टर वापरल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवल्या जातात आणि ती व्यक्ती म्हातारपणी कशी दिसेल हे देखील दाखवले जाते.


हेही वाचा – फेसबुक लाईव्ह दरम्यान तरुणाची आत्महत्या