‘या’ गल्लीत Kissकरण्यासाठी तरुण-तरुणी इथं रांगा लावून राहतात उभे

'ही' आहे किस गल्ली जाणून घ्या कुठे आहे.

'या' गल्लीत Kiss केल्यास प्रेम अबाधित राहतं; तरुण-तरुणी इथं रांगा लावून राहतात उभे

आयुष्यात प्रेम एकदा तरी होत, असे म्हटलं जातं. मात्र, तेच प्रेम अबाधित राहवं आणि लग्न व्हाव याकरता अनेक जण प्रयत्न देखील करत असतात. मात्र, तुम्हाला तुमचे प्रेम अबाधित राहवं, असे वाटत असले तर अशा एका गल्लीला भेट द्या. जिथे किस केल्यानंतर तुमचे प्रेम आयुष्यभर टिकेल. मेक्सिकोत असे एक शहर आहे, जे प्रेमी युगुलांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

या शहरात आहे ही किस गल्ली

मेक्सिकोतल्या गुआनायुआटो या शहरात अशी एक गल्ली आहे, त्या गल्लीला किस गल्ली म्हणून ओळखले जाते. या गल्लीमध्ये जर प्रेमी युगुलाने एकमेकांना किस केलं तर त्यांचं प्रेम अबाधित राहतं, अशी कहाणी सांगितली जाते. त्याचबरोबर १५ वर्षं त्यांचं नशीब उजळतं असाही समज आहे. ‘alley ऑफ द किस’, असं या गल्लीचं नाव आहे. त्यामुळे या गल्लीत येऊन किस करण्यासाठी जगभरातील तरुण-तरुणी इथं लांबच्या लांब रांगा लावून उभे असतात.

ही आहे प्रेम कहाणी

गुआनायुआटो या शहरातील या गल्लीचे ‘alley ऑफ द किस’ हे नाव देण्यामागे एक प्रेमकहाणी आहे. १५ व्या शतकात Ann ही एक श्रीमंत घरातील मुलगी होती. तसेच तिच्यावर प्रेम करणारा कार्लोस हा एक गरीब घरातील मुलगा होता. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. पण, समाजाच्या विरोधामुळे त्यांना आपले प्रेम लपूनछपून व्यक्त करावे लागायचे. त्यामुळे हे दोघे या गल्लीत येऊन भेटायचे. एकदा या दोघांना त्यांच्या घरातल्यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांच्या प्रेमाला विरोध करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या गेल्यात. पण, त्या धमक्यांना दोघेही घाबरले नाहीत. त्यामुळे शेवटी Annaच्या वडिलांनी तिचा त्याच गल्लीत खून केला. दरम्यान, तिला वाचवताना कार्लोसनेही आपले प्राण गमावले. अशाप्रकारे मेक्सिकन प्रेमकहाणी अजरामर झाली. त्यामुळे या प्रेमकहाणीवरून या गल्लीला ‘alley ऑफ द किस’ नाव मिळालं आणि ही गल्ली देखील आता प्रेमाचं प्रतीक झाली आहे.


हेही वाचा – दररोज नशा करून एसी कारमध्येच झोपायचा, पण तो विकेंड शेवटचा ठरला