घरदेश-विदेशCBI वि. CBI : अस्थानांचे आरोप अलोक वर्मांनी फेटाळले

CBI वि. CBI : अस्थानांचे आरोप अलोक वर्मांनी फेटाळले

Subscribe

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थानांनी केलेल आरोप आता सीबीआयचे संचालक लोक वर्मा यांनी फेटाळून लावले आहेत. राकेश अस्थानांनी केलेल्या आरोपावर आता अलोक वर्मांनी आपलं उत्तर लेखी रूपात मांडलं आहे.

सीबीआयमध्ये लाचखोरीवरून सुरू झालेला वाद अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला. यावर सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थानांनी केलेल आरोप आता सीबीआयचे संचालक लोक वर्मा यांनी फेटाळून लावले आहेत. राकेश अस्थानांनी केलेल्या आरोपावर आता अलोक वर्मांनी आपलं उत्तर लेखी रूपात मांडलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणामध्ये सीव्हीसी सध्या तपास करत आहे. यातील एक रिपोर्ट सीव्हीसीनं यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात दिला देखील आहे. त्यानंतर आता राकेश अस्थाना यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. यापूर्वी सीव्हीसीनं दिलेल्या रिपोर्टमध्ये अलोक वर्मा यांना क्लिन देण्यात आलेली नाही.

सीबीआयमध्ये अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यामध्ये सुरू झालेल्या वादानंतर सरकारनं थेट हस्तक्षेप केला. दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. शिवाय, १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -