घरदेश-विदेशदाऊदला पकडायला अमेरिका मदत करणार

दाऊदला पकडायला अमेरिका मदत करणार

Subscribe

कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक भारताला मदत करण्याचे अमेरिकेने कबूल केले आहे.

कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक भारताला मदत करण्याचे अमेरिकेने कबूल केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊदला पकडण्यासाठी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबविण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेला सोबत घेऊन भारत पाकिस्तानात कदाचित सर्जिकल स्ट्राईक करू शकतो.

दाऊद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड अतिरेकी आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड आहे. तसेच पाकिस्तानात असलेला दाऊद अतिरेक्यांच्या संघटनांना फंडींग करतो, असाही त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे 2003 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दाऊदला पकडल्यास दहशतवाद्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार हे निश्चित आहे. त्यामुळे अमेरिकेने दाऊदवर 25 लाख डॉलर्सचे बक्षीसही लावले आहे. इतकेच नव्हेतर भारत आणि अमेरिकेने संयुक्तरित्या दाऊदच्या मालमत्तेविरोधात अभियान चालवले आहे. त्यामुळे युएई आणि ब्रिटनमधील त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. दाऊद हा आता भारत आणि अमेरिका या दोघांचाही शत्रू आहे. त्यामुळे दाऊद लवकरच पकडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -