घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजॉर्ज फ्लॉईड यांना झाला होता कोरोनाचा संसर्ग!

जॉर्ज फ्लॉईड यांना झाला होता कोरोनाचा संसर्ग!

Subscribe

२५ मे २०२०ला आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झाला. ही घटना मिनियापोलिस इथं घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत पोलिस अधिकारी डेरेक शौविनने  जमिनीवर पडलेल्या जॉर्ड यांच्या मानेवर गुडघा दाबत असल्याचं दिसतं. हा प्रकार काही मिनिटं सुरू होता. फ्लॉईड हे सातत्याने त्यांना श्वास घेता येत नाही, असं सांगत होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर एक धक्कादायक बाब समोर येत आहे. जॉर्ज फ्लॉईड यांना कोरोनाची बाधा झाली होती.

मिनियापोलिस पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या जॉर्ज फ्लॉइडचा पोस्टमार्टम अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जॉर्ज यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात समोर आले आहे. हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने फ्लॉइड कुटुंबाच्या परवानगीनंतर २० पानांचा अहवाल जाहीर केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मुख्य वैद्यकीय तपासणीकर्त्याच्या अहवालात असेही कळविण्यात आले आहे की फ्लॉइड हे कोरोना संक्रमित होते. पण त्यांच्यात कोणतीच कोरोनाची लक्षण दिसत नव्हती.  तथापी त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, असा कोणताच अहवाल देण्यात आलेला नाहीये.

- Advertisement -

हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षकांनी एका अहवालात म्हटले आहे की, मानेवर दिलेल्या दबावामुळे अचानक जॉर्ज फ्लॉइड यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे जॉर्ज यांचा मृत्यू झाला. त्यात म्हटले आहे की बराचवेळ अधिकाऱ्यांनी त्यांचा गळा दाबल्यामुळे जॉर्जला हृदयविकाराचा झटका आला

या घटनेचा जगभरातून निषेध होऊ लागला आहे. मिनिॅपोलिस-सेंट पॉल या परिसरात सुरुवातीला शांततापूर्ण निदर्शनं झाली. पण त्यानंतर या निदर्शनांना हिंसक वळण लागलं. पोलिस आणि जमाव यांच्यात झटापटीच्या घटनाही घडल्या. अमेरिकेतील न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन या राज्यांतही निदर्शनं सुरू झाली आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – धक्कादायक! ‘या’ देशाला शाळा सुरू करणं पडलं महागात; ६८०० जणांना केलं क्वारंटाइन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -