अमेरिकेने सांगितले, एक हजार चिनी विद्यार्थ्यांचा Visa रद्द करण्याचे कारण

अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेणं आवश्यक आहे.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता या देशांतील नागरिकांवरही होऊ लागला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अमेरिकेने जूननंतर हजारपेक्षा जास्त चिनी विद्यार्थी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारचा असा विश्वास आहे की, ज्या चीनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे त्यांचा चिनी सैन्याशी संबंध आहे.

चीनी लोकांच्या व्हिसावरील बंदीची घोषणा

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की “उच्च पदवीधर विद्यार्थी आणि संशोधन करणाऱ्या संशोधकांना” निष्कासित केले गेले कारण ते राष्ट्रपतींच्या घोषणेनंतर बेकायदेशीर असल्याचे आढळले. त्यामुळे ते व्हिसासाठी अपात्र होते. दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी लोकांच्या व्हिसावरील बंदीची घोषणा केली आणि त्याची सुरुवात १ जूनपासून झाली. ट्रम्प म्हणाले की, चीन अमेरिकेची संवेदनशील माहिती आणि बौद्धिक संपत्ती हस्तगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवित आहे, या लोकांच्या मदतीने पीपल्स लिबरेशन आर्मीची क्षमता वाढविणे महत्वाचे आहे.

सुरक्षेसाठी हा निर्णय घेणं आवश्यक

तर परराष्ट्र विभागाने असे म्हटले, “अमेरिकेतील चिनी पदवीधर विद्यार्थी आणि संशोधक अमेरिकेच्या तंत्रज्ञान, बौद्धिक संपत्ती आणि प्रगत सैन्य क्षमतेशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात गुंतले होते. अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेणं आवश्यक आहे. तसेच कोरोना विषाणूच्या साथीमुळे बरेच विद्यार्थी यापूर्वीच चीनला परतले असले तरी ३ लाख ६९ हजार चिनी नागरिक अमेरिकेत शिकत आहेत. अलीकडील घोषणेला बीजिंगने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


Corona रुग्णांच्या उपचारावर Plasma Therapy प्रभावी नाही – ICMR