भारता विरोधात पाकिस्तान करतोय दहशतवाद्यांचा वापर – बराक ओबामा

भारता विरोधात पाकिस्तान करतोय दहशतवाद्यांचा वापर - बराक ओबामा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाचे नवीन पुस्तक ‘ए प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) भारतमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक भारतीय नेत्यांच्या उल्लेख केला आहे. ज्यानंतर त्या पुस्तकांची अधिक चर्चा वाढली आहे. बराक ओबामा यांनी या पुस्तकात पाकिस्तानी सैन्य भारता विरोधात दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाले आहे, असा दावा केला आहे. या पुस्तकात ओबामा यांनी आपल्या राजकारणातील प्रवासा विषयी लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या राजकारणाच्या कार्यकाळात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा ओसामा बिन लादेनच्या खात्माच्या उल्लेख केला आहे.

ओसामा बिन लादेनच्या ठिकाण्यावर झालेल्या छाप्यात पाकिस्तानला समावेश का नाही केला हे देखील पुस्तकात नमूद केला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य विशेषतः त्यांची गुप्तचर एजेंसी आयएसआय तालिबान आणि अल-कायद्याच्या संपर्कात आहे. पाकिस्तानी सैन्य कधी-कधी या दहशतवादी संघटनाचा अफगाणिस्तान आणि भारतविरोधात वापर देखील करते. पुढे ओबामा म्हणाले की, ‘२ मे २०११ रोजी केलेल्या सीक्रेट ऑपरेशनला तत्कालीन संरक्षण सचिव रॉबर्ट गेट्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना विरोध केला होता.’

‘जेव्हा आम्हाला या गोष्टी माहिती मिळाली की, ओसामा पाकिस्तानच्या बाहेरी परिसरातील ॲबोटाबादमधील सुरक्षित ठिकाणी राहत आहेत. तेव्हा येथे सीक्रेट ऑपरेशन करण्याची योजना आखली. ही योजना टॉप सीक्रेटमध्ये राहावी. कारण जर याबाबत जराशी पण माहिती लीक झाली असती तर कधीच आम्हाला यश मिळवता आले नसते. याशिवाय आम्ही पाकिस्तानला या योजनेत सामील न करण्याचा निर्णय घेतला’, असे बराक ओबामांनी लिहिले आहे.