पाकचे पंतप्रधान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी देखील या भेटीच्या वृत्ताला दुजोरा

Mumbai

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान २२ जुलै रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. या दोघांमध्ये दोन्ही देशामध्ये असलेले द्विपक्षीय संबंध चांगले व्हावे याकरिता या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते, असे एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भाची माहिती दिली आहे. दोन देशांच्या प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्याचे एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले आहे. पण अजून त्याच्या भेटीच्या योजनेची तयारी झालेली नाही.

या मुद्द्यांवर होणार चर्चा

या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक बाबींवर सखोल चर्चा होणार असल्याचे समजते आहे. यासह दहशतवाद संपवणं, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे.

पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पहिलाच अमेरिका दौरा

पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान प्रथमच अमेरिकेचा दौरा करणार आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी देखील या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम् यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला बोलावले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इमरान खान जाऊ शकले नव्हते, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी सांगितले आहे. मात्र ही भेट आता २२ जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान, आता इमरान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादावर काय चर्चा होते? तसेच भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का? हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे