घरदेश-विदेशबाण मारलेला अमेरिकन पर्यटक एकटा नव्हता - पोलीस

बाण मारलेला अमेरिकन पर्यटक एकटा नव्हता – पोलीस

Subscribe

अंदमान - निकोबार बेटांवरील आदिंवस्यांनी बाण मारून हत्या करण्याप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. मयत पर्यटक या ठिकाणी एकटा नसल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे.

अमेरिकेतून अंदमान-निकोबार बेटांवर फिरण्यासाठी आलेल्या जॉन एॅलन चौ या परदेशी नागरिकाची आदिवस्यांनी हत्या केली. मात्र अजूनही पोलिसांचा तपास सुरु आहे. जॉन हा या ठिकाणी एकटा आला नसून त्याच्या बरोबर इतरही नागरिक आले असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. जॉन या ठिकाणी अनेकदा आला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जॉनने या आदिवास्यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रेरित केले असल्याचे एका पत्रातून समोर आले होते. याच ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये तपास केल्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात अमेरिकेच्या टेनेसीयेली ५३ वर्षीय महिला आणि कोलोरॅडो येथील २५ वर्षीय मुलगा जॉन सोबत  असल्याचे आढळून आले आहे. हे दोन्ही परदेशी नागरिक ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान बेटाजवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यांनतर हे नागरिक आपल्या देशी परतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

अंदमान- निकोबार बेट फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकाला बाण मारून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उडकीस आली होती. हत्यानंतर या पर्यटकाचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला. त्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली होती. अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे आता दूतावासाने जाब मागितला होता. याची दखल आंतरराष्ट्रीय स्थरावर घेतली जात आहे.

- Advertisement -

पर्यटकाने मरण्यापूर्वी लिहिले होते पत्र

चौ याने १६ नोव्हेंबर रोजी त्याने एक पत्र त्याच्या पालकांना लिहिले होते. त्यात त्याने लिहिले होते की, प्राण धोक्यात घालून माझे येथे येणे तुम्हाला वेडेपणाचे वाटेल.पण या लोकांना (सेंटिनेल आदिवासींना) येशूचा संदेश पोहोचवण्यासाठी धोका पत्करायलाच हवा असे मला मनापासून वाटते. हे करताना माझे प्राण गेले तर त्या आदिवासींवर किंवा देवावर रागावू नका त्यांचा काहीच दोष नाही, मी जे करतो ते निरर्थक नाही.प्रत्येकाने आपआपल्या भाषेत प्रभूची उपासना करावी, असे बायबलमध्ये लिहिले आहे. हे आदिवासीही त्यांच्या भाषेत देवाची पूजा करतात. मला तेच पाहायचे आहे, असे त्याने पत्रात लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -