घरट्रेंडिंग... म्हणून 'या' वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापली कोरोनाने बळी घेतलेल्या रूग्णांची नावं!

… म्हणून ‘या’ वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापली कोरोनाने बळी घेतलेल्या रूग्णांची नावं!

Subscribe

या वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होतोना दिसतोय.

अमेरिकेतील कोरोना व्हायरस या महामारीचे गांभीर्य लक्षात यावे तसेच कोरोना या जीवघेण्या आजाराची तीव्रता लोकांना समजावी, लोकांना जागरूक करण्यासाठी एका देशाने चक्क कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल १ लाख लोकांची नावं एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापली आहेत. कोरोनाने बळी गेलेल्या तब्बल १ लाख लोकांची नावं छापून त्या वृत्तपत्राची फ्रंट पेज स्टोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होतोना दिसतोय.

अमेरिकेच्या अग्रगण्य वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या पहिल्या पानावर कोणतीही बातमी, ग्राफिक किंवा जाहिरात प्रकाशित केली नाही तर कोरोना व्हायरसने जीव गमावलेल्या लोकांची नावं त्यांच्या देशात प्रकाशित केले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने या मथळ्यामध्ये लिहिले की, अमेरिकेत जवळजवळ १ लाख लोक कोरोनाने मृत्युमुखी पडले, हे अकल्पनीय नुकसान आहे. यानंतर, या कोरोनाने बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहताना असे लिहीले की, या मृतांच्या यादीत फक्त नावं नाही तर ते आम्हीच आहोत… या वृत्तपत्रात मृतांची नावं पहिल्या पानावर का प्रकाशित केली? यासंदर्भातील एक लेख ‘टाईम्स इनसाइडर’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

- Advertisement -

खरंतर, न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकांनी कोरोनाची ही भयानक परिस्थिती दर्शविण्याचा निर्णय घेतला. ग्राफिक डेस्कचे सहाय्यक संपादक सिमोन लँडन यांना ही आकडेवारी अशा प्रकारे दाखवायची होती, त्यातून असंख्य लोकं मरण पावल्याने त्याचे गांभीर्य लक्षात येईल, यासह कोणत्या श्रेणीतील अधिक लोकांचा कोरोनाने बळी गेला हे देखील लक्षात येईल… न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्व विभागातील पत्रकार जीवतोडून या महामारीच्या घटनेचे वार्तांकन करत आहेत. यावेळी कोरोना सारख्या परिस्थितीत अशा प्रकारे वृत्तपत्राची मांडणी आणि सजावट करून माइल स्टोन ठरणारं काम करत असल्याचे ग्राफिक डेस्कचे सहाय्यक संपादक सिमोनने सांगितले.

- Advertisement -

एलेन या संशोधकाने कोरोना व्हायरसने बळी गेलेल्या लोकांची नावे तसेच शोक वृत्तांत आणि मृत्यू झालेल्या लोकांची माहीती वेगवेगळ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या शेकडो वृत्तपत्रांमधून हजारोंची ही नावं शोधली. ही नावं न्यूज रूममधील संपादकांनी पत्रकारितेतील नुकतेच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने गोळा केली असल्याचे देखील सांगितले जात आहे.


रेड झोनमधील विमानतळ सुरु करणं धोकादायक; ‘या’ निर्णयाला गृहमंत्र्यांचा विरोध!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -