घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus:अमेरिका, तुला चीनवर भरवसा नाय का? का नाय?

CoronaVirus:अमेरिका, तुला चीनवर भरवसा नाय का? का नाय?

Subscribe

चीनमध्ये कोरोनाची सुरुवात होऊन देखील तिथे कोरोना लवकर नियंत्रणात आला आणि जगभरात मात्र मोठ्या प्रमाणात पसरला, या पार्श्वभूीवर चीनच्या आकडेवारीवर संशय घेतला जाऊ लागला आहे,

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या वेगाने होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, ज्या चीनमधून आणि तिथल्या वुहान शहरातून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती, तिथे आता परिस्थिती सामान्य झाली असून जगातली महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाने आपलं केंद्र बनवलं आहे. अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ४ हजार ५४२ मृत्यू झाले असून तब्बल २ लाख ६ हजार २०७ अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. एरवी अमेरिकी नागरिक जगाच्या पाठिवर कुठेही असले, तरी त्यांच्या सुरक्षेसाठी जंग जंग पछाडणाऱ्या अमेरिकी प्रशासन आणि सरकारलाच आता कोरोना नावाच्या न दिसणाऱ्या व्हायरसने पछाडलं आहे.पण अमेरिकेत इतके रुग्ण असताना चीनमध्ये इतके कमी रुग्ण कसे?यावरून आता अमेरिकेकडून चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. चीनकडून जाहीर करण्यात येणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्ये खरंच तथ्य आहे का? असा सवाल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केला आहे.

चीनी कोरोनाग्रस्तांमध्ये वेगाने घट कशी झाली?

चीनमध्ये कोरोनाची सुरुवाच वुहान या शहरातून झाली होती. सुरुवातीच्या काळात मोठ्या वेगाने चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण
वाढताना आणि मरताना देखील दिसत होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ही रुग्णसंख्या जणूकाही आटली आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी देखील ३ हजारांच्या आसपास असणारी चीनधली मृतांची संख्या अजूनही ३ हजार ३१६पर्यंतच मर्यादित आहे. शिवाय बाधितांचा आकडा ८२ हजार ३६१ पर्यंत सीमित झाला आहे. त्यामुळे चीनने अशी कोणती जादुची कांडी फिरवली, की तिथल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये इतक्या वेगाने घट झाली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.

- Advertisement -

‘चीन खरं बोलतंय, हे आपल्याला काय माहीत?’

अमेरिकी सिनेटमध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला गेला आहे. एनडीटीव्हीने ब्लूमबर्गच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटल्यानुसार, ‘अमेरिकेत चीनपेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत हा दावाच खोटा आहे. चीनमध्ये सत्तेत असलेली कम्युनिस्ट पार्टी आपला प्रभाव कायम राखण्यासाठी याआधीही खोटं बोलली आहे, आत्ताही खोटं बोलते आहे आणि पुढेही बोलत राहणार आहे’, असा आरोप अमेरिकी सिनेटने केला आहे. शिवाय, खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच भर पत्रकार परिषदेत चीनच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करताना, ‘चीनचा दावा बरोबर आहे हे आपल्याला कसं कळू शकेल? त्यांनी जाहीर केलेली आकडेवारी ही जरा कमीच वाटतेय’, असं वक्तव्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर चीनने केलेल्या दाव्याची शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.


Corona Effect! लॉकडाऊनचा नियम मोडलात, तर शूट अॅट साईट, ‘या’ देशानं काढलं फर्मान!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -