घरदेश-विदेशअमित शाह यांची नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक

अमित शाह यांची नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक

Subscribe

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद प्रभावित राज्यांची ही पहिलीच बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत आज नक्षलवाद ग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित राज्यात नक्षलवादी कारवायांमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच उपाय यावर मंथन झाले.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आणि गृह मंत्रयातील उच्च अधिकारी देखील उपस्थित होते.

- Advertisement -

या महत्वपूर्ण बैठकीत नक्सालवाद प्रभावित क्षेत्र, तेथील विकास कामे तसेच राज्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद प्रभावित राज्यांची ही पहिलीच बैठक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -