घरदेश-विदेशजेटलींचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान - अमित शाह

जेटलींचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान – अमित शाह

Subscribe

अरुण जेटली यांच्या निधनामुळे देशाचे राजकारण आणि भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, जी लवकर भरुन येणार नसल्याची, भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

मी अरूण जेटली यांच्या अकाली निधनामुळे अतिशय दुःखी आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. मी केवळ संघटनेचा ज्येष्ठ नेता नाही तर परिवारातील सदस्याला मुकलो आहे. त्यांचे मार्गदर्शन मला कैक वर्षांपासून मिळत होते. त्यांच्या निधनामुळे देशाचे राजकारण आणि भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, जी लवकर भरुन येणार नसल्याची, भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले अमित शहा

आपला अनूभव आणि अनोख्या क्षमतेसह अरुण जी यांनी पक्ष आणि सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. उत्तम वक्ते आणि समर्पित कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांनी देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद अशा महत्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळली‘.

- Advertisement -

तसेच अरूण जी यांनी रालोआ सरकारच्या २०१४२०१९ या कार्यकाळात पंतप्रधानांचे गरीबांचे कल्याण हे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यास आणि जगातील वेगाने विकसित होणारी देशाची अर्थव्यवस्था निर्माण करुन अर्थमंत्रीपदाचा ठसा उमटवला आहे. ते लोकाभिमुख नेते होते आणि नेहमी सर्वसामान्यांचा विचार करत. त्यांचा प्रत्येक निर्णयमग तो काळ्या पैशावर कारवाई करण्याचा असो, जीएसटीएक देशएक कर, हे स्वप्न साकार करण्याचा, नोटाबंदी असो, यातून हे दिसून येते. देश सदैव त्यांचे अतिशय सरळ आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून स्मरण करेल‘, अशी भावना शहा यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – Live : जेटलींना अखेरचा निरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -