घरदेश-विदेश'बंगाल हिंसाचारावर निवडणूक आयोग शांत का?'

‘बंगाल हिंसाचारावर निवडणूक आयोग शांत का?’

Subscribe

रोड शो दरम्यान आमच्यावर तीन हल्ले झाले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगड, आगीचे गोळे फेकून मारले. सीआरपीएफमुळे काल वाचलो असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बंगालमधील हिंसाचारावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे दरम्यान अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहेत. बंगालमधील रोड शो दरम्यान माझ्यावर तीन हल्ले झाले असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. आम्ही शांततेत रोड शो काढला होता. मात्र आमच्यावर तीन हल्ले झाले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगड, आगीचे गोळे फेकून मारले. सीआरपीएफमुळे काल वाचलो. ते नसते तर सुखरुप बचावलो नसतो असे अमित शहा यांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांनी हल्लेखोरांना थांबवले नसल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

- Advertisement -

राजकारणासाठीच तृणमूलने पुतळा तोडला

पश्चिम बंगालमधील हिंसाचार ही चिंतेची बाब आहे. हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले. तसंच त्यांनीच ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्याचा प्रकार केला असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. राजकारणासाठीच तृणमूलने पुतळा तोडला. कारण कॉलेजच्या आतमध्ये भाजपचे कार्यकर्ते नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी

बंगालमधील हिंसाचारावर निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप अमित शहांनी केला आहे. हिंसाचारावर निवडणूक आयोग शांत का आहे. हिंसाचारानंतर तृममूलच्या कार्यकर्त्यांना अटक का नाही केली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, अमित शहांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जीने दाखल केलेल्या एफआयआरला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार

दरम्यान, भाजपचा विजय होणार हे निश्चित आहे. भाजप ३०० जागा मिळवून स्वबळावर सत्तेत येणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे. तर बंगालमध्ये भाजप २३ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बंगालमधील हिंसाचार हा तृणमूल काँग्रेसने पराभव दिसत असल्यामुळे केला असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे दिवस आता भरले असल्याचे देखील शहा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – 

पश्चिम बंगाल हिंसाचार; निवडणूक आयोगाची बैठक; भाजपा करणार आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -