अल्पसंख्याक म्हणत विरोधकच करतायत भेदभाव – अमित शहा

New Delhi
amit-shah
अमित शहा

संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. हे विधेयक जर लोकसभेत मंजूर झालं तर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, अफगाणिस्तान इत्यादी राज्यांमधून भारतात घुसखोरी करणारे मुस्लीम धर्म वगळता इतर धर्माच्या निर्वासितांना भारताचे नागरिकत्व दिलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी आतापर्यंत मांडलेले सर्व विधेयक मंजूर झाले आहेत. त्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याचा महत्त्वाचा विधेयक आहे. त्यानंतर आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. अमित शहा लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा प्रस्ताव मांडला. मात्र, हा विधेयक सादर करण्याअगोदरच लोकसभेत विरोधकांकडून प्रचंड विरोध केला गेला. यामध्ये काँग्रेसचे खासदार अग्रस्थानी आहेत.