अमित शाह ‘कोरोनामुक्त की कोरोनाग्रस्त’ संभ्रम कायम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोरोनामुक्त की कोरोनाग्रस्त याबाबत संभ्रम कायम आहे.

amit shah
केंद्रीय मंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर रविवारी अमित शाह कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत दिली होती. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यामुळे अमित शाह कोरोनामुक्त की अद्याप कोरोनाग्रस्त याबाबत संभ्रम कायम आहे.

नेमके काय घडले?

अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज, ९ ऑगस्ट रोजी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे तिवारी यांनी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले. पण, अवघ्या तासाभरातच त्यांनी ते ट्विट डिलीट करुन टाकले. त्यातच, अमित शाह यांची कोरोनाची नव्याने कोणतीही चाचणी झालेली नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्र्याने दिले आहे. त्यामुळे आता अमित शाह कोरोमुक्त झाले आहेत की नाहीत याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

अमित शाह हे गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. मात्र, त्या बैठकीत सोशल डिन्स्टसिंगचे पालन करण्यात आले होते, असे सूत्रांनी आयएअनएसला सांगितले. तसेच बैठकीत साऱ्यांनीच मास्क लावले होते. शाह यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा – ‘सुशांत प्रकरणावरुन राजकारण करणं घृणास्पद’