घरदेश-विदेशअमित शहा यांच्या जीवाला धोका; गृहमंत्र्यालयाने दिली 'एएसएल' सुरक्षा

अमित शहा यांच्या जीवाला धोका; गृहमंत्र्यालयाने दिली ‘एएसएल’ सुरक्षा

Subscribe

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. अमित शहांना गृहमंत्र्यालयाने 'एएसएल' सुरक्षा दिली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अमित शाह यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना एएसएलची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. आतापर्यंत अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यामुळे आता अमित शाह संपूर्ण देशभरामध्ये एएसएलचे कवच प्राप्त करुन फिरणार आहेत. गुप्तचर विभागाने केलेल्या आढाव्यानंतर गृहमंत्रालयाने अमित शहा यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. अमित शहा यांना मिळालेल्या नविन सुरक्षेनुसार ज्याठिकाणी त्यांचा दौरा असणार आहे त्या ठिकाणी सर्वात आधी एएसएलची टीम पोहचेल. त्यानंतर एएसएल सुरक्षारक्षक घटनास्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करुन त्यानंतर त्याठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना सुरक्षितेसंबंधित सूचनांचे पालन करणयास सांगतिल.

अशी असणार अमित शहांना सुरक्षा

गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना अमित शहा यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण प्रक्रियांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दोन आठवड्यांपूर्वी एएसएल टीम कार्यक्रम ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेईल. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांच्या सुरक्षेसंदर्भात एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये त्यांना राऊंड क्लॉक सीआरपीएफच्या सुरक्षेचे कवच मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्याचसोबत ३० कमांडो प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत असणार आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातून स्थानिक पोलिसांची टीम देखील तैनात असणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनंतर शहांना सुरक्षा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सध्या एएसएल सुरक्षा कवच आहेत. ज्या प्रतिष्ठित लोकांच्या जीवाला धोका असतो त्यांना याप्रकारची सुरक्षा दिली जाते. मसलन, एसपीजी, जे प्लस, झेड, वाई और एक्स अशाप्रकारच्या सुरक्षा दिल्या जातात. वेळोवेळी या प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातो. त्यानुसारच त्यांच्या सुरक्षेत वाढ किंवा सुरक्षा कमी करायचा निर्णय घेतला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -