बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले बॉलिवूडचे शेहनशाह

बिहार राज्यासाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडे सुपूर्त

Bihar
amitabh bachchan
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन

सध्या बिहार राज्यात पावसाने धूमाकूळ घालून पुर परिस्थिती निर्माण करत चांगलेच कहर केले आहे. सलग जोरदार पाऊस कोसळत असल्याने बिहारमधील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे बिहारमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १९९४ साली आलेल्या पूरपरिस्थिती सारखी परिस्थिती पुन्हा बिहारवर ओढावली आहे, असे सांगण्यात येत आहे. यावेळी या पूरग्रस्तांकरिता तेथील मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अनेक जण तेथील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहे. यामध्ये बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन देखील पुढे सरसावले आहेत.

अमिताभ यांच्याकडून सहाय्यता निधीस ५१ लाखांची मदत

या पूरग्रस्तांना मदत करताना अमिताभ यांनी बिहार राज्यांकरिता ५१ लाख रूपयांचा धनादेश देत आपली मदत त्यांच्या पर्यंत पोहोचवली आहे. अमिताभ बच्चन यांचे प्रतिनिधी विजयनाथ मिश्र यांच्याद्वारे मदत निधीचा धनादेश बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडे सुपूर्त केला आहे. यासह बच्चन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासाठी लिहिलेलं पत्र ही मिश्र यांनी मोदी यांच्याकडे दिले आहे.

‘पुरग्रस्त बिहारच्या मदतीसाठी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचे प्रतिनिधी विजय नाथ मिश्र यांच्याद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ लाखांचा धनादेश दिला आहे’, असे लिहित एक ट्विट सुशील कुमार मोदी यांनी केले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीला धावलेल्या अमिताभ बच्चन यांचे आभार आणि कौतुक केले जात आहे.


हेही वाचा – बिहारमधील पूरात ‘या’ मॉडेलने केलं फोटोशूट