घरदेश-विदेशबारामुल्लामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

बारामुल्लामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

Subscribe

सोपोर भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहेत. जवानांनी या दहशतवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरु आहे. सोपोर भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असून जवानांनी या दहशतवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवान चोखप्रत्युत्तर देत आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -

दोन ते तीन दहशतवादी लपले

मिळालेल्या माहितीनुसार, जवानांना बारामुल्लाच्या सोपोर भागातील वारपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त मोहिम करत दहशतवाद्यांचा शोध सुरु केला. जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान, घटनास्थळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोखप्रत्युत्तर दिले. सध्या चकमक सुरु असून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. या हल्ल्याची जबाबदारी या दहशतवादी संघटनेने स्विकारली. या हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत जैश-ए – मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दोन कमांडरचा समावेश होता. याच दहशतवाद्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -