घरदेश-विदेशलष्कराला मोठे यश; पुलवामा हल्ल्याच्या २ मास्टरमाईंडचा खात्मा

लष्कराला मोठे यश; पुलवामा हल्ल्याच्या २ मास्टरमाईंडचा खात्मा

Subscribe

पुलवामाच्या पिंगलिना येथे दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत मेजरसह चार जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पुलवामाच्या पिंगलिना येथे दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, या चकमकित एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. पिंगलिना परिसरामध्ये ही चकमक सुरु आहे. दरम्यान, जवानांना मोठे यश आले आहे. पुलवामा हल्ल्याच्या दोन मास्टरमाईंडचा खात्मा करण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कमांडर कामरान राशिद गाजी आणि बिलाल अहमद नाइक उर्फ राशिद भाई या दोघांचा खात्मा करण्यात जवानांना मोठे यश आले आहे. दहशतवादी लपून बसलेले घरचं जवानांनी उध्वस्त केले. पहाटे तीन वाजल्यापासून चकमक सुरु आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या पुलवामापासून २१ किलोमीटरवर असलेल्या पिंगलिना येथे पहाटे ३ वाजल्यापासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांना चोखप्रत्युत्तर देत असताना मेजरसह ४ जवान शहीद झाले आहे. तर या चकमकी दरम्यान एका स्थानिक नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. चकमकीत शहीद झालेले सर्व जवान ५५ राष्ट्रीय रायफल्सचे आहेत. तर गोळीबार करणारे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेचे आहेत. दरम्यान, जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला घेराव घातला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसला लक्ष्य केले. २५० किलो स्फोटकांची कार बसला धडकवून केलेल्या स्फोटामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यायचा अशी मागणी प्रत्येक भारतीयांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -