आंध्रप्रदेश गँगरेप : माजी सैनिकांसह ७ जणांना अटक

आरोपी पीडित मुलीला वारंवार ब्लॅकमेल करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. गेल्या वर्षभरापासून तिच्यावर आरोपी बलात्कार करत होते.

Andhra Pradesh
Andhra pradesh Gang rape case
प्रातिनिधक फोटो

आंध्रप्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयिन मुलीवर दोन माजी सैनिकांसह ९ जणांनी बलात्कार केला. आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील गिद्दलूर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन संशयित आरोपी फरार झाला आहेत. पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरु आहे. कोल्ड्रिंगमधून गुंगीचे औषध देऊन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आहे.

अशी घडली घटना

आंध्रप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इंटरमिजिएटची विद्यार्थिनी आहे. के सुरेंद्र नावाच्या एका व्यक्तिने तिला कोल्ड्रिंगमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर आरोपीने त्याच्या इतर मित्रांना बोलावले आणि पीडित मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी पीडित मुलीला वारंवार ब्लॅकमेल करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. गेल्या वर्षभरापासून तिच्यावर आरोपी बलात्कार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणाऱ्यांमध्ये दोन माजी सैनिकांचा देखील समावेश आहे.

७ जणांना अटक २ जण फरार

पीडित मुलगी सतत टेंशनमध्ये असल्याचे पाहून तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडे विचारपूस केली. सुरुवातीला तिने सांगण्यास नकार दिला. पण नंतर तिने तिच्यासोबत घडलेला सर्व घृणास्पद प्रकार रडत रडत तिच्या कुटुंबियांना सांगितला. हे ऐकूण पीडित मुलीच्या कुटुंबियांना देखील धक्का बसला. त्यांनी शेवटी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून ७ जणांना अटक केली आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरु आहे.

हेही वाचा – 

अश्लील फोटोचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here