घरदेश-विदेशविशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती; २ जणांचा जागीच मृत्यू

विशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती; २ जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे पुन्हा एकदा गॅस गळतीची धक्कादायक घटना समोर आली आहे. औषधे तयार करणाऱ्या कंपनीत गॅस गळती झाल्याने २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर ४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायनर लाइफ सायन्सेस फार्मा कंपनीत ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार परवाडा येथील जवाहरलाल नेहरू फार्मा सिटीमध्ये सोमवारी रात्री उशिरा बेंझ्मिडोल वेपर नावाचा विषारी गॅस बाहेर निघत असल्याची माहिती मिळाली. या कंपनीत काम करणाऱ्या ६ लोकांना त्याचा त्रास झाला. त्यापैकी २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका केमिकल फॅक्ट्रीत अशाच प्रकारे गॅस गळती झाली होती.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी देखील आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या एलजी पॉलिमर कंपनीत गॅस गळतीची घटना घडली होती. टँकरमधून स्टीरिन गॅसची गळती झाली असून या अपघातात जवळपासच्या गावांतील एक हजाराहून अधिक लोकांना याची बाधा झाली होती. या घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा विशाखापट्टणमध्ये गॅस गळतीची घटना समोर आली आहे.

हेही वाचा –

सांत्वन करायला गेले आणि झाले कोरोनाबाधित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -