घरदेश-विदेशअनिल अंबानींच्या कंपन्या डबघाईला! खात्यात केवळ १९ कोटी?

अनिल अंबानींच्या कंपन्या डबघाईला! खात्यात केवळ १९ कोटी?

Subscribe

अनिल अंबानी यांच्या कंपन्या आर्थिक डबघाईला आल्याचं आता समोर आलं आहे. कारण १४४ कंपन्यांच्या खात्यामध्ये केवळ १९. ३४ कोटी रूपये शिल्लक आहेत.

धीरूबाई अंबानींचे पुत्र आणि उद्योगपती असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपन्या डबघाईला आल्या असल्याची माहिती आता समार येत आहे. कारण, अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या खात्यामध्ये केवळ आता १९.३४ कोटी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या १४४ बँक खात्यात ही शिल्लक बाकी आहे. राफेल विमान प्रकरणामध्ये सध्या अनिल अंबानींच्या कंपनीला कंत्राट दिलेलं असल्यानं वाद सुरू आहेत. त्याच आता त्यांच्या कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगली नसून त्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानींच्या आरकॉम या कंपनीवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यादरम्यान सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान नवी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ही माहिती देण्यात आली.

वाचा – डासू आणि राफेलचा काहीच संबंध नाही – अनिल अंबानी

आरकॉम कंपनीवर सध्या ४६ हजार कोटींचं कर्ज आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांनी आरकॉमचा गाशा गुंडाळला होता. तर दुसरीकडे राफेल या लढाऊ विमानांच्या बांधणीमध्ये देखील अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट मिळाल्यानं त्यावर देखील टिका होत आहे. यावर दसॉल्ट या कंपनीनं अनिल अंबानी यांची कंपनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचं कारण पुढे केलं. पण , सध्या जी माहिती समोर येत आहे त्यावरून अनिल अंबानी यांच्या कंपनीची आर्थिस स्थिती स्पष्ट होते. दरम्यान, टॉवर कॉर्पने दाखल केलेल्या दाव्यावर आता १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय नेमकं काय निर्णय देणार हे स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -