कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन वापरा; WHOला उपरती

New Delhi
WHO Director-General Tedros Adhanom Ghebreyesus
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडहॅनॉम घेबेरियसस

जागातिक आरोग्य संघटनेने कोरोना उपाचारासाठी हायड्रोक्सीक्लोक्वीन औषधाचा वापर पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापरावर तूर्तास बंदी घातली होती. पण त्यानंतर काही तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की, देशातील हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपाचारासाठी हायड्रोक्लोरोक्वीन औषधाचा वापर बंद करावा. तर काही जणांचे म्हणणे होते की, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयाचे पालन करणे भारताला बंधनकारक नाही आहे.

२५ मे रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी सांगितले होते की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधावर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. डेटा सुरक्षा देखरेख मंडळाने आत्तापर्यंत प्राप्त केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे. गेल्या आठवड्यात लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेणाऱ्या लोकांना हृदयासंबंधी आजार आणि मृत्यूचा धोका वाढला आहे. यामुळेच जागतिक स्तरावर या औषधाच्या वापरावर तूर्तास बंदी घातली गेली आहे. ही तूर्तास घातलेली बंदी फक्त कोरोनाच्या रुग्णांसंबंधित आहे. या बंदीचा इतर आजारांच्या बाबतीत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापरासंदर्भातील नियमांवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय कोरोना विषाणूच्या उपचारांशी संबंधित असलेले संशोधन सुरुच राहतील, असे घेब्रेयेसुस यांनी स्पष्ट केले होते. पण आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावर उपचार करण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीन औषधाचा वापर करण्यास सांगितले आहे.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या विमानांवर लावले निर्बंध